Young man commits suicide after killing father and grandfather
मुंबई : एका तरुणाने स्वतःच्या वडील आणि आजोबांची हत्या करून स्वतः बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. मुलुंड पश्चिम येथील वसंत ऑस्कर बिल्डिंगमध्ये ही घटना घडली.
शार्दूल मांगले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आज (६ मार्च) सकाळी 9 वाजताच्या दरम्यान त्याने त्याचे वडील मिलिंद मांगले आणि आजोबा सुरेश मांगले यांच्यावर चाकूने वार केले. या वेळी त्यांचा केयरटेकर अनंत कांबळे याने त्यांना अगोदर वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर घाबरून तो बाथरुममध्ये कडी लावून लपला.
सुरेश मांगले (आजोबा), मिलिंद मांगले (वडील) आणि शार्दूल मांगले (मुलगा) अशी मृतांची नावं आहेत. शार्दूलनं हे टोकाचं पाऊल का उचललं, याबद्दल अद्याप काहीही माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील स्वत: घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…