मुंबई

मुंबईत पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलं, वाहतूक विस्कळीत

मुंबई : मुंबईत आज मान्सून दाखल झाला असून पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईतील दादर, हिंदमाता, सायन, माटुंगा, अंधेरी सबवे, किंग्ज सर्कल तसेच कुर्ला परिसर येथे पाणी साचले आहे. दोन ते तीन फूट पाणी भरल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

रेल्वे रुळावरही पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला आणि सीएसएमटी दरम्यानची मध्य रेल्वे बंद झाली आहे. तर हार्बर रेल्वेवरील वाशी- ते सीएसएमटी वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. पश्चिम मार्गावरील अंधेरी- सीएसएमटी वाहतूकही ठप्प झाली आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने बेस्टनेही वाहतुकीचे आठ मार्ग बदलले आहेत. पश्चिम द्रुतगती मार्ग व पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ढगाळ हवामान आणि मुसळधार पावसामुळे दृष्यमानता देखील कमी झाली होती.

मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणात 9 जून ते 13 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे. रायगड जिल्ह्यातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 10 आणि 11 जूनला रायगड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच अतिवृष्टीच्या काळात नागरिकांना नदी, समुद्र आणि धरण परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago