मुंबई

धक्कादायक! प्रेमसंबंधातून १५ वर्षीय मुलगी गर्भवती, बाळ जन्मलं आणि…

मुंबई : कल्याण-पश्चिमेतील बारावे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रसूती झाली असून जन्मलेलं नवजात बाळ जन्मताच कचऱ्याच्या डब्यात टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीचा पर्दाफाश केला असून २२ वर्षीय रोहित प्रदीप पांडे याला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे रोहित पांडे या २२ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधातून ती गर्भवती झाली होती. प्रसूतीनंतर तिने एका मुलीला जन्म दिला; मात्र त्या नवजात बालिकेला कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आले. दरम्यान, मंदिराजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तिथे धाव घेतली. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. खडकपाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून नवजात बाळाला ताब्यात घेतलं आणि रुग्णालयात दाखल केलं. सध्या या बाळावर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे.

पोलिसांनी या मुलीला कचऱ्यात फेकून देणाऱ्या तिच्या पालकांचा शोध सुरु केला. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता हे प्रकरण समोर आले. त्यांनी अल्पवयीन मुलगी आणि तिचे संबंध याबाबत माहिती गोळा केली. तपासाअंती रोहित पांडे हा या प्रकारामागे असल्याचे उघड झाले आणि त्याला अटक करण्यात आली. ही मुलगी अल्पवयीन असल्याने पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या प्रकरणात आरोपी तरुणाचे आई-वडील आणि अल्पवयीन मुलीची आजी यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या सर्वांविरोधात पालकत्व लपवण्याचा आणि नवजात बालिकेच्या जीवाला धोका निर्माण केल्याचा गुन्हा नोंदवला जाणार आहे.

अल्पवयीन आईला प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झाल्याने ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृतीही स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलिस डीएनए तपासणीसाठी तयारी करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago