मुंबई

सेवा प्रवेश नियम शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या काही पदांचे प्रलंबित सेवा प्रवेश नियम मंडळाच्या शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत. उर्वरीत पदांसाठी मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत, असे निर्देश राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

महाराष्ट्र सागरी मंडळ, गृह (बंदरे व परिवहन) विभागाची सेवा प्रवेश नियम-विनियम करण्याबाबत बैठक मंत्रालयात झाली, त्यावेळी मंत्री भुसे बोलत होते. यावेळी परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, बंदरे विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात, मुख्य बंदर अधिकारी कॅ. संजय शर्मा आदी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले, सेवा प्रवेश नियम हे शासनाच्या कोणत्याही पदाच्या भरतीसाठी आवश्यक असणारा मूलभूत कायदेशीर दस्तऐवज आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयाद्वारे सेवा प्रवेशाचा आदर्श नमुना देण्यात आला आहे. त्यानुसार सेवा प्रवेश अद्ययावत करण्यात यावेत असे मंत्री भुसे यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी सैनी म्हणाले, महाराष्ट्र सागरी मंडळात 59 संवर्गात 525 पदे मंजूर असून त्यामध्ये तांत्रिक व अतांत्रिक पदांचा समावेश आहे. त्यापैकी 45 संवर्गाचे सेवा प्रवेश नियम तयार करण्यात आले आहेत. उर्वरित 14 संवर्गाचे सेवा प्रवेश नियम तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच 45 पैकी 38 संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमास मंडळाची मान्यता घेण्यात आली आहे. उर्वरित सात संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमास मंडळाच्या पुढील बैठकीत मान्यता घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago