मुंबई

अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी मतदानापूर्वी तसेच मतमोजणी दिवशी मुंबई उपनगरात मद्यविक्री नाही

मुंबई : मुंबई उपनगरातील १६६- अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान प्रक्रिया तर ६ नोव्हेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी मतदानाच्या ४८ तासापूर्वी ते मतदान संपेपर्यंत तसेच मतमोजणी दिवशी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

पूर्वेस मिठी नदी-१६८ चांदिवली पासून दक्षिणेस सहर रोड, बाप नाला-१६७, विलेपार्लेपर्यंत तसेच पश्चिमेच्या पश्चिम रेल्वे ट्रॅक -१६८ अंधेरी पश्चिम पासून उत्तरेस जत्वार नगर रोड नंबर ५, जे.व्ही.एल.आर. रोड-१५८ या परिसरातील सर्व मद्य परवाने बंद असतील. हा बंद कालावधी मतदानाच्या ४८ तासांपूर्वी म्हणजेच दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत किंवा मतदान संपेपर्यंत असेल. त्याचप्रमाणे, मतमोजणीच्या दिवशी म्हणजे दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्ण दिवस मद्यविक्री बंद असेल.

सबब दिनांक १ नोव्हेंबर (सायंकाळी ६ पासून), २ नोव्हेंबर, ३ नोव्हेंबर (मतदान संपेपर्यंत) आणि ६ नोव्हेंबर २०२२ या दिवशी मुंबई उपनगरातील नमूद परिक्षेत्रात मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करून फौजदारी कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमती चौधरी यांनी कळविले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago