मुंबई

अँटिलीया स्फोटक प्रकरणी घटनेचे नाट्यरुपांतर, सचिन वाझे यांना मोठा कुर्ता घालून चालायला लावलं

मुंबई : अँटिलीया स्फोटक प्रकरणी NIA सचिन वाझे यांची कसून चौकशी करत आहे. याच पार्श्वभूमीवर घटनास्थळावर या घटनेचे नाट्यरुपांतर देखील करण्यात आले आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हे नाट्यरुपांतर करण्यात आले आहे. जवळपास अर्धा तास हे नाट्यरुपांतर सुरु होते.

स्फोटकं ठेवल्यानंतर पीपीई किट सदृष्य मोठ्या आकाराचा कुर्ता घालून एक व्यक्ती स्कॉर्पिओतून मागील बाजूने उतरुन निघून गेली होती. याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. ही व्यक्ती सचिन वाझेच आहेत का? हे पाहण्यासाठी सचिन वाझे यांना घटनास्थळी आणून या घटनेचे नाट्यरुपांतर करण्यात आले. यासाठी अगोदर सर्व ठिकाणी मार्किंग केलं होतं. सचिन वाझे यांची नैसर्गिक चाल ओळखण्यासाठी त्यांना अनेकदा चालण्यास सांगितलं जात होतं. हे सर्व तपासण्यासाठी सीसीटीव्ही रिझोल्युशनचा कॅमेरा वापरून तो कॅमेरा शिडीद्वारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या उंचीवर लावण्यात आला होता.

सचिन वाझे यांना सुरुवातीला पँट-शर्टमध्ये चालण्यास सांगण्यात आले. यानंतर त्यांना मोठ्या आकाराचा कुर्ता घालून आणि डोक्याला रुमाल बांधून दोन ते तीन वेळा चालायला लावले. दरम्यान, या नाट्यरूपांतरण करण्याअगोदर पुण्यावरुन एका खास फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते. या पथकाने हे सर्व पुरावे आपल्या सोबत तपासासाठी घेतले आहेत. NIA कडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago