मुंबई

वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांची मुंबई हायकोर्टात बिनशर्त माफी, दिली ‘ही’ हमी

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे प्रकरणात मुंबई हायकोर्टात हमी देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले. गेल्या सुनावणीत कोणतेही वक्तव्य करणार नसल्याची लेखी हमी देऊनही त्याचे हेतुत: उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर अवमान कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा करत न्यायालयाने नवाब मलिक यांना खडसावलं होतं. या वेळी त्यांनी कोर्टात खेद व्यक्त केला. कोर्टाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे अशी विधाने करणार नाही, अशी हमी त्यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली.

समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांच्या मानहानी दाव्यातील अर्जावर एकल न्यायमूर्ती पीठासमोर सुनावणी पूर्ण होऊन निकाल येईपर्यंत वानखेडे कुटुंबियांविरोधात कोणतीही विधाने करणार नाही, अशी लेखी हमी हायकोर्टात दिल्यानंतरही मलिक यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आक्षेपार्ह विधाने केली. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने मलिक यांना जाब विचारत कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याबद्दल तुमच्याविरुद्ध नोटीस का काढू नये, याबद्दल प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे मलिक यांनी आज चार पानी प्रतिज्ञापत्र दाखल करून कोर्टाची बिनशर्त माफी मागितली आणि यापुढे वानखेडे यांच्याविषयी कोणतीही विधाने करणार नसल्याची हमी दिली.

‘ज्ञानदेव वानखेडे यांनी त्यांच्या अर्जात माझी तीन विधाने दाखवली असली तरी, ती मी प्रासारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमधील आहेत. पत्रकारांनी विविध व व्यापक विषयांवर विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात माहिती देताना मी तशी विधाने केली होती, असे नमूद केले. त्यामुळे मी हायकोर्टात दिलेल्या हमीचे उल्लंघन होत नसल्याचा माझा समज होता. मात्र, वानखेडे यांच्याविषयीच्या कोणत्याही विधानाने कोर्टातील हमीचे उल्लंघन होते, असे मला आता समाजवण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे त्यांच्याविषयी कोणतेही विधान मी करणार नाही. मात्र, केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय हेतूने होणारा वापर आणि त्या यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून पदाचा होणारा दुरुपयोग याविरोधात बोलण्यास मला प्रतिबंध असल्याचा अर्थ माझ्या या हमीचा घेतला जाऊ नये’, असे मलिक यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago