मुंबई

बेस्टच्या इलेक्ट्रिक बसला बॅटरी चार्ज करताना लागली आग

मुंबई : मुंबईतील नागरी वाहतूक संस्था बेस्टद्वारे चालवल्या जाणार्‍या इलेक्ट्रिक बसला बॅटरी चार्जिंग करताना आग लागली. ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली. शुक्रवारी पहाटे बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट)च्या बसला मालवणी उपनगरात आग लागली. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

बसच्या छतावर असलेल्या बॅटरी सेटमध्ये ही आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आग आणखी पसरू नये म्हणून जवळच उभ्या असलेल्या बसेस तातडीने हलवल्या. बसेसमधील अग्निशमन यंत्रांचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्नही केला, मात्र तो अपुरा ठरला. दरम्यान, अग्निशमन दलाला तात्काळ माहिती देण्यात आली, त्यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पहाटे ५.१५ च्या सुमारास आग आटोक्यात आणली.

बेस्ट बसेसला आग लागण्याची या वर्षातील ही सहावी घटना आहे तर तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीतील तिसरी घटना आहे. 17 जुलै रोजी शहरातील अंधेरी भागातील मरोळ येथे बेस्टच्या बसला आग लागली, त्यावेळी 30 हून अधिक प्रवासी सुखरूप बचावले होते, तर एक महिना अगोदर 16 जून रोजी मालवणी उपनगरातील एका डेपोमध्ये उभी असलेल्या परिवहन संस्थेच्या इलेक्ट्रिक वातानुकूलित बसला आग लागली होती.

बेस्ट उपक्रम मुंबई, शेजारील ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर शहरांमध्ये सार्वजनिक बस सेवा पुरवते. वेगवेगळ्या खाजगी कंत्राटदारांकडून भाड्याने घेतलेल्या सुमारे 3,500 बसेसच्या ताफ्यासह 30 लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली जाते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago