मुंबई

मुलीवर आणि अल्पवयीन नातीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास जन्मठेपेची शिक्षा

मुंबईतील विशेष कोर्टाने लैंगिक अपराधांविषयी संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत एका 65 वर्षीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या व्यक्तीला त्याच्या मुलीवर आणि अल्पवयीन नातीवर बलात्कार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरविले आहे. पीडित महिलेने कोर्टासमोर केलेल्या निवेदनात म्हटले की ती 15 वर्षाची असल्यापासून तिचे वडील तिच्यावर बलात्कार करीत होते.

पीडित महिलेने सांगितले की लग्नानंतरही ती तिच्या आई-वडिलांबरोबर राहत होती. तिच्या वडिलांनी तिला धमकी दिली होती की तिने कुणाला याबाबत सांगितले तर तो तिच्या मुलांना इजा करेल. महिलेच्या म्हणण्यानुसार, ती आपल्या आईबरोबर घरकाम करायची. तर तिचे वडील, भाऊ आणि नवरा चित्रकार होते. या महिलेने कोर्टाला असेही सांगितले की तिने शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीला तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल सांगितले होते. त्या व्यक्तीचे नंतर निधन झाले. त्यानंतर तिने इतर कोणालाही याबद्दल सांगितले नाही.

या महिलेने कोर्टात सांगितले की 2017 मध्ये एक दिवस, दुसर्‍या वर्गात शिकणाऱ्या तिच्या मुलीने तिला सांगितले की रात्री आजोबा जेव्हा तिच्याबरोबर झोपतात तेव्हा ते तिच्याशी गैरवर्तन करतात. त्यानंतर मुलीने तिला सविस्तर सर्व काही सांगितलं. मुलीकडून हे सर्व ऐकल्यानंतर महिलेने तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तिच्या वडिलांविरुध्द गुन्हा दाखल केला.

सर्व पुरावे व युक्तिवादानंतर न्यायाधीश रेखा एन. पांढरे यांना आरोपी भादंवि कलम 376 (२) (बलात्कार) आणि पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी आढळला. कोर्टाने या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा आणि दंडही ठोठावला. आरोपीला मुलीला 5०,००० रुपये आणि नातीला 25,००० रुपये भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

9 मिनिटे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 दिवस ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 महिने ago