मुंबई

दादर रेल्वे स्टेशनमध्ये खळबळ! एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये सापडला मृतदेह

मुंबई : दादर रेल्वे टर्मिनलमध्ये उभ्या असलेल्या रणकपूर एक्स्प्रेसमधील टॉयलेटमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रणकपूर एक्स्प्रेस दादर स्टेशनवर उभी असताना आरपीएफकडून रेल्वेची तपासणी करण्यात आली. यावेळी ही घटना समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, रणकपूर एक्स्प्रेस दादरमध्ये आल्यानंतर आरपीएफकडून रेल्वेची चेकिंग सुरू होती. त्यादरम्यान ही घटना उघडकीस आली. रेल्वेची तपासणी करतेवेळी ट्रेनमध्ये अगदी कमी प्रवासी होते. आरपीएफने एक्स्प्रेसच्या डब्ब्यातील टॉयलेटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही दरवाजा आतून उघडत नव्हते. आरपीएफने प्रयत्न केले पण दरवाजा उघडला जात नव्हता. शेवटी दरवाजा तोडण्यात आला. यावेळी टॉयलेटमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. एका व्यक्तीने टॉवेलच्या मदतीने टॉयलेटमध्ये आत्महत्या केली होती. या घटनेने मोठी खळबळ उडाली. यानंतर रेल्वे पोलिसांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून तपासणी केली. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, मृत व्यक्तीजवळ मोबाईल फोन किंवा इतर काही ओळखपत्र सापडले नाही. गाडी दादरमध्ये आल्यावरच या व्यक्तीने फाशी घेतली की, अगोदरच याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. हा व्यक्ती कोण, कुठून आला, आत्महत्या करण्याचे कारण काय याचा तपास सुरु आहे. बुधवारी उशीरा रणकपूर एक्स्प्रेस दादर स्टेशनवर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago