Maharashtra Governor felicitates Gymnasts winning a bounty of medals for the country
मुंबई : कझाकस्तान येथे सप्टेंबर महिन्यात झालेल्या 12 व्या एशियन ऍक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील पदक विजेत्या महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक खेळाडूंचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी 5 सुवर्ण, 4 रौप्य व 11 कांस्य पदकांची कमाई केली.
बृहन्मुंबई जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष इंदरजित सिंह राठोड, सचिव आशिष सावंत, खेळाचे संस्थापक महेंद्र चेंबूरकर, राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते सुरेश भगत, चेअरमन नीलम बाबर देसाई व संयोजक प्रफुल मोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी सुवर्ण पदक विजेत्या ऋतुजा जगदाळे, प्रीती एखंडे, सोनाली बोराडे, रितिका महावर, अक्षता ढोकले, रौप्य पदक विजेते आकाश गोसावी, आदित्य खसासे व कांस्य पदक विजेते अंचल गुरव, अरना पाटील, निक्षिता खिल्लारे, कुणाल कोठेकर, रितेश बोराडे, नमन महावार, प्रशांत गोरे व प्रशिक्षक राहूल ससाणे तसेच योगेश पवार, निशांत करंदीकर, शुभम गिरी यांचा सत्कार करण्यात आला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…