Congress leader and former Energy Minister Nitin Raut admitted to Hospital in Hyderabad
हैदराबाद : काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत तेलंगणातील हैदराबाद येथील वासवी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या उजव्या डोळ्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली असल्याची माहिती आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान ते खाली पडले होते आणि त्यांना दुखापत झाली होती.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, भारत जोडो यात्रेत राज्याचे माजी ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत सहभागी झाले होते, परंतु प्रचंड गर्दीत झालेल्या धावपळीत ते पडले, यात त्यांच्या कपाळाला जखम झाली आणि पायालाही मुका मार लागला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. 70 वर्षीय राऊत यांच्यावर 2020 मध्ये अॅन्जियोप्लास्टी झाली असून त्यांची प्रकृती आता ठिक आहे.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा
काँग्रेसची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी तमिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरु झाली. आतापर्यंत तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून यात्रा झाली असून एकूण १२ राज्यांतून ही यात्रा जाणार आहे. या संपूर्ण यात्रेत राहुल गांधी 3750 किमीचा प्रवास करत आहेत. महाराष्ट्रात येत्या 7 नोव्हेंबर रोजी ही यात्रा येईल.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…