मुंबई

डबलडेकर इलेक्ट्रिक वातानुकूलित बस व प्रीमियम बससेवेचे लोकार्पण

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या बेस्टला अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका त्यांच्या मागण्यासंदर्भातील आवश्यक तो निधी लवकरच वितरित करेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम) उपक्रमाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून डबलडेकर इलेक्ट्रिक वातानुकूलित बसगाडी व प्रिमियम बससेवेचे लोकार्पण तसेच बेस्ट कॉफी टेबल पुस्तक, बेस्ट उपक्रमाची अमृत महोत्सवी कथा पुस्तकाचे प्रकाशन, स्वयंचलित मार्गप्रकाश व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

एन.सी.पी.ए च्या टाटा थिएटर येथे झालेल्या कार्यक्रमास यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त, तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल, बेस्ट उपक्रम महाव्यवस्थापक लोकेश चंद्र हे उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘बेस्ट’ ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. वाहतूक, विद्युत पुरवठा या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी बेस्टने नेहमीच चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. कुठलाही ऋतू, नैसर्गिक आपत्ती असो बेस्ट नागरिकांच्या सेवेत अविरत कार्यरत आहे. कोरोनात देखील अखंड सेवा सुरु होती. बदलत्या काळाप्रमाणे आपल्या सेवेत बदल केल्यामुळे बेस्ट यशस्वीपणे सेवा देत आहे. डबलडेकर इलेक्ट्रीक वातानुकूलित बस आणि प्रिमियम बससेवा हे बेस्टच्या बदलाचे उदाहरण आहे. मुंबईला प्रदूषण मुक्त करण्यासाठी बेस्टच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविण्यात येत आहे. मुंबईच्या वीज वितरण प्रणालीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून वितरण कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करीत आहोत. पदवी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बेस्टने पासेस देण्याची कार्यवाही करावी. बेस्टची सेवा जागतिक दर्जाची होण्यासाठी राज्य शासन सर्व प्रकारची आवश्यक ती मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

चांगले रस्ते ही प्रगतीची पहिली पायरी आहे. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गामुळे वाहतूक व्यवस्थेसह अर्थकारणातही मोठे बदल झाले. एमएसआरडीसीचे यामध्ये मोठे योगदान आहे. समृद्धी महामार्गामुळे देखील आता असेच मोठे बदल होणार आहेत. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्धी देणारा हा महामार्ग ठरेल.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर

केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबरोबरच बेस्टचाही अमृत महोत्सव हा अपूर्व योग आहे. ‘बेस्ट’ ही खऱ्या अर्थाने मुंबईची लाईफलाईन आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजून बळकट आणि प्रवाशांना सुविधा देणारी असावी, यावर भर देण्यात येत आहे.

पर्यावरणपूरक वाहने हेच वाहतूक व्यवस्थेतील पुढील भविष्य असेल. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यावरही भर देण्यात आहे. याद्वारे पर्यावरणाचे रक्षणही होईल. ‘बेस्ट’चे चलो अॅप प्रवाशांसाठी खूप उपयुक्त ठरत आहे. बेस्टला केंद्र सरकारही नेहमी मदत करेल. रस्तेबांधणीत आता क्रांतिकारक बदल होत असून डबलडेकर, थ्री लेअर ब्रीज यापुढे बांधावे लागतील. पनवेल जंक्शन विकसित करण्यात येत आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago