महाराष्ट्र

दिव्यांग कल्याण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारासाठी 28 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून सन २०२१ व २०२२ या वर्षांसाठी दिव्यांग व्यक्तींकरीता राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकन व अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ ऑगस्ट २०२२ पर्यंत आहे. अर्ज, नामांकने www.awards.gov.in या संकेतस्थळावरुन भरण्याचे आवाहन दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून करण्यात आले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार २०२१ व २०२२ करिता २८ ऑगस्ट २०२२ पूर्वी प्राप्त अर्ज, नामांकने विचारात घेण्यात येतील. सन २०२१ आणि सन २०२२ करिता स्वतंत्ररित्या अर्ज, नामांकने केवळ गृह मंत्रालयाने तयार केलेल्या URL.www.awards.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करुन विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. समक्ष अथवा पोस्टाद्वारे सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

पात्रता निकष व इतर सविस्तर तपशील विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावरील मार्गदर्शक सूचनांनुसार विचारात घेण्यात येतील, असे दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी कळविले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago