मुंबई

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, तिघांची प्रकृती गंभीर तर अनेक जण जखमी

पनवेल : मुंबई-गोवा महामार्गावर 2 बसची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. पनवेलजवळ ही घटना घडली. या अपघातात दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर सुमारे १५ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मुंबई-गोवा महामार्गावर दोन बसची धडक होऊन हा अपघात झाला. मात्र, अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अपघात होताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. बराच वेळ प्रवाशांना काय करावे समजत नव्हते. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी तातडीने जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात पाठवले. जखमींपैकी काही प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. जखमींच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, अपघातानंतर महामार्गावर बराच वेळ ट्राफिक जाम झाला होता. वाहतूक व्यवस्था लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी पोलीस कार्यरत आहेत, बस हटवण्यात येत आहेत. दुसरीकडे, काही प्रवाशांनी सांगितले की अपघात अचानक झाला, कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago