sanjay raut
मुंबई : ईडीने पत्रा चाळ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना शुक्रवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. गोरेगावमधील पत्रा चाळच्या पुनर्विकासातील कथित आर्थिक अनियमितता आणि पत्नीच्या मालमत्तेशी संबंधित आर्थिक व्यवहारांप्रकरणी ईडीने राऊत यांना रविवारी अटक केली.
संजय राऊत यांना आज मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने राऊत यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयाने कोठडी वाढवताना सांगितले की, ईडीने तपासात बरीच प्रगती केली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर काही वेळातच वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. सक्तवसुली संचालनालयाने यापूर्वी न्यायालयाला सांगितले होते की मुंबईतील ‘चाळी’च्या पुनर्विकास प्रकल्पातील कथित अनियमिततेतून शिवसेनेचे खासदार आणि त्यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपये “गुन्ह्याची प्रक्रिया” म्हणून मिळाले आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…