ED issues third summons to former Home Minister Anil Deshmukh
मुंबई : ईडीने अनिल देशमुख यांना आतापर्यंत तीनवेळा चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मात्र देशमुख यांच्याकडून विविध कारणे पुढे केली जात आहेत. अशातच आता अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश देशमुख यांनाही ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटी वसुलीच्या गंभीर आरोपानंतर अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यांची ईडी चौकशीही सुरू झाली.
दरम्यान, अनिल देशमुख यांना ५ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले असून याच प्रकरणात मुलगा ऋषीकेश यांना ६ जुलै रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ईडीकडून अनिल देशमुख यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांच्या स्वीय सहाय्यकाला आणि खासगी सचिवाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…