मुंबई

ब्रेकिंग : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांबाबत मोठा निर्णय

मुंबई :  मुंबई महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज महापालिकेत सादर करण्यात आला आहे. शिक्षण विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २९४५ कोटींची तरतूद केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात १. १९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच अर्थसंकल्पात महापालिकेच्या शाळांचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय करण्यात आला आहे.

सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती संध्या दोशी यांच्याकडे शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प आज सादर केला. पालिकेच्या शाळांचे नामांतर ‘मुंबई पब्लिक स्कुल’ असे करण्यात येणार आहे. महानगर पालिकेच्या शाळांबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक विभागाच्या ९६३ आणि माध्यमिक विभागाच्या २२४ मनपा शाळांच्या मूळ नावासह मुंबई पब्लिक स्कुल (M.P.S) जोडण्यात येणार आहे. त्यासाठी नवा लोगोही तयार करण्यात आला आहे.

कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला. त्यामुळं या वर्षीच्या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅप आणि चॅट बोटच्या माध्यमातून करिअर काऊन्सिलिंग साठी २१.१० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आता शाळा सुरु होत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शाळांसाठी सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर यासाठी १५.९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका शाळेतील 1300 वर्गखोल्या डिजीटल क्लासरुम होणार असून त्यासाठी 28.58 कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे.

शिक्षण विभाग अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये :

  1. पुढील वर्षात १० नवीन सीबीएसई शाळा सुरू करणार
  2. बालवाडी सक्षमीकरण साठी स्वयंसेवी संस्थांशी करार
  3. २४ शाळांमध्ये दहावीपर्यंत शिक्षण सुविधा वाढविणार
  4. २७९ मराठी माध्यमाच्या बालवाडी वर्गांमध्ये ६ महिन्याच्या कालावधीसाठी रॉकेट लर्निंग व आकांक्षा फाऊंडेशन या एनजीओमार्फत प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यात येणार
  5. २४ शाळांमध्ये संगीत केंद्र सुरू करणार
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago