मुंबई

विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांनो आता व्हा सावधान

मुंबई : योग्य प्रकारे ‘मास्क’ परिधान करणे, हा कोरोनास प्रतिबंध करण्‍याचा सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. मास्क वापरण्याबाबत मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर विना मास्क सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्यांवर २०० रुपये एवढा दंड आकारला जात आहे. ही दंडात्मक कारवाई महानगरपालिका क्षेत्रात अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबई पोलीस दल, वाहतूक पोलीस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश पालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांना दिले आहेत.

चहल यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना महापालिका आयुक्तांनी वरील निर्देश दिले आहेत. या बैठकीला महापालिकेचे सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, महापालिका रुग्णालयाचे अधिष्ठाता, सार्वजनिक आरोग्य खात्यातील वैद्यकीय अधिकारी आणि महापालिकेच्या विविध खात्यांचे अतिवरिष्ठ अधिकारी आणि मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून उपायुक्त शहाजी उमप उपस्थित होते.

या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे :

  1. विना मास्क विषयक दंडात्‍मक कारवाई आता पोलीस देखील करणार
  2. मुंबई महापालिकेच्‍या सर्व २४ विभागांच्‍या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक परिसरांमध्‍ये विना मास्क वावरणाऱ्या नागरिकांवर प्रत्‍येक वेळी, प्रत्‍येक ठिकाणी रुपये २०० याप्रमाणे दंडात्‍मक कारवाई यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे.
  3. ही दंडात्मक कारवाई आता अधिक कठोरपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी प्रभाग स्तरीय नियोजन करण्याचे व त्यासाठी संबंधित नगरसेवकांचे सहकार्य घेण्याचे निर्देश देण्यात आले.
  4. दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यासाठी संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. यानुसार संबंधित संस्थांचे प्रतिनिधी व महापालिका कर्मचारी यांच्याद्वारे नियमितपणे कारवाई सुरु आहे.
  5. विना मास्क विषयक दंडात्मक कारवाईसाठी मुंबई पोलीस दल व वाहतूक पोलीस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई नियमितपणे करणार.
  6. मुंबई पोलीस दल व वाहतूक पोलीस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई योग्यप्रकारे व्हावी, याकरिता महापालिकेच्या सर्व २४ विभागांच्या स्तरावर  संयुक्त कारवाई आराखडा तयार करण्याचे व त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश.
  7. दुकानदार, विक्रेते, दुकान-उपहारगृहे इत्यादी ठिकाणी काम करणारे विक्रेते व कर्मचारी, मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक इत्यादींवर देखील ‘विना मास्क’ विषयक कारवाई करण्याचे निर्देश.
  8. आवश्यकतेनुसार संबंधित कलमांन्वये कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago