मुंबई

ED ची कारवाई, दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई आणि डिनो मोरिया यांची संपत्ती जप्त

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी (2 जुलै) अभिनेता डिनो मोरिया, काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती जप्त केली आहे. बँक घोटाळा आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.

पीएमएलए कायद्याअंतर्गत या चार जणांची संपत्ती जप्त करण्याचे सुरुवातीचे आदेश दिल्याचे ईडीने सांगितले. संपत्तीची एकूण किंमत 8.79 कोटी रुपये असल्याचं ईडीने आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. यात आठ मालमत्ता, तीन वाहनं आणि इतर बँक अकाऊंट्स, शेअर्स/म्युचल फंड यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या संपत्तीपैकी तीन कोटी रुपयांची मालमत्ता संजय खान यांची आहे. डिनो मोरियाची संपत्ती 1.4 कोटी रुपये आहे आणि डिजे अकीलची संपत्ती 1.98 कोटी रुपये आहे. तर अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दिकी यांची संपत्ती 2.41 कोटी रुपयांची आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago