Appointment of Anil Kumar Gaikwad as Co-Managing Director of MSRDC
मुंबई : महाराष्ट्र शासनाने दोन वेळा उत्कृष्ट अभियंता या पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव अनिलकुमार बळीराम गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई येथे सह व्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी) या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने आज जाहीर केला आहे.
अनिलकुमार गायकवाड हे नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते/ बांधकामे) सचिव पदावरून सेवा निवृत्त झाले. त्यांचे महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागात खूप मोठे योगदान आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या कार्यात अनिलकुमार गायकवाड यांचा मोठा सहभाग आहे. जमीन अधिग्रहण पासून ते रस्ते तयार होई पर्यंत ची सर्व तांत्रिक बाजू भक्कम पणे त्यांनी सांभाळली आहे. समृद्धी महामार्गाचे ८५% काम पूर्ण झाले असुन उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी साधारण आणखी दोन वर्षाचा कालावधी लागेल. त्यासाठी गायकवाड यांना सेवानिवृत्ती नंतर त्यांच्या कार्याची दखल घेवून राज्य शासनाने त्यांना एम एस आर डी सी च्या सह- व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती दिली आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती केल्याने समृद्धी महामार्ग लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा आहे.
अनिलकुमार गायकवाड यांनी अनेक महत्त्वाच्या कामातुन आपली ओळख निर्माण केली आहे. त्यापैकी पुणे -मुंबई एक्स्प्रेस वे, मुंबईतील सी-लिंक पुल, मुंबई आणि ठाणे शहरातील जवळपास सर्व उड्डाण पुले, समृद्धी एक्स्प्रेस वे, मुंबई मधील विलासराव देशमुख फ्री वे, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचे आधुनिकीकरण केलेली ईमारत, मुंबई हायकोर्ट इमारत दुरुस्ती, हाई माऊंट बिल्डिंग, सह्याद्री इमारत, विशेष म्हणजे देशाच्या राजधानी दिल्ली येथील नविन “महाराष्ट्र सदन”, नुकतेच लातुर जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धाटन केलेले देशातील पहिले नवीन टेक्नॉलॉजीचे हायब्रीड पुल, देशातील नदीवर तयार केलेले सर्वांत उंच लोखंडी पुल, देशातील सर्वाधिक लांब असा आठ किलोमीटर चा बोगदा, अशी अनेक महत्त्वाकांक्षी कामे गायकवाड यांच्या कार्यकाळात त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे हाताळली आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि बुद्धिमत्तेचा फायदा राज्याला निश्चितच होईल.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…