मुंबई

अंधेरी (पू) पोटनिवडणूक; मतदान यंत्र सरमिसळीकरण प्रक्रिया पूर्ण

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘१६६ अंधेरी (पूर्व) या मतदारसंघात ३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणारी मतदान प्रक्रिया नि:पक्षपणे पार पडण्याच्या दृष्टीने मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सर्वस्तरीय कार्यवाही सुरु आहे. याचाच भाग म्हणून मतदान प्रक्रियेत महत्त्वपूर्ण असणाऱ्या मतदान यंत्रांचे ‘द्वितीय सरमिसळीकरण’ (Second Randomization) निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार केंद्रीय निरीक्षक देवेश देवल यांच्या उपस्थितीत आज झाले.

अंधेरी (पूर्व) मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यवाहीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील आणि संबंधित उपस्थित होते. हे सरमिसळीकरण नि:पक्षपणे व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाच्या संगणकीय प्रणालीद्वारे (Computer Software) करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अजित साखरे यांनी दिली.

या पोटनिवडणूक प्रक्रियेकरिता २५६ मतदान केंद्रे असणार असून या मतदान केंद्रांवर ३३३ बॅलेट युनिट, ३३३ कंट्रोल युनिट आणि ३५९ व्हीव्हीपॅट यंत्रे उपयोगात आणली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघात जेवढ्या यंत्रांची आवश्यकता आहे, त्यापेक्षा सुमारे २० टक्के अतिरिक्त बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट आहेत. तर सुमारे ३० टक्के अतिरिक्त व्हीव्हीपॅट यंत्रांची तजवीज करण्यात आली आहे. जेणेकरून कोणत्याही यंत्रामध्ये काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास पर्यायी यंत्रांची व्यवस्था सहजपणे होऊ शकेल. मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान उपयोगात येणारी यंत्रे ही सशस्त्र सुरक्षादलाच्या कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे २४ तास देखरेख ठेवण्यात येत आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोटनिवडणुकीबाबतची विविध स्तरीय प्रक्रिया निर्धारित वेळापत्रकानुसार वेळोवेळी सुरु आहे. त्यानुसार पोटनिवडणूकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याद्वारे सातत्याने विविध स्तरीय कार्यवाही अव्याहतपणे सुरु आहे. यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन आणि तेथील अधिकारी व कर्मचारी हे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देखील कार्यरत असतील. मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी ३ नोव्हेंबर रोजी मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही प्रक्रिया अधिकाधिक सुदृढ करावी, असे आवाहन केले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago