Forest Minister Sudhir Mungantiwar
मुंबई : मच्छिमार सहकारी सोसायट्यांच्या सदस्यांना नावेच्या डिझेल वर देण्यात येणाऱ्या अनुदानाची थकबाकीची रक्कम वितरित करण्याचे आदेश आज शासनाने जारी केले आहेत. मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील सूचना विभागाला दिल्या होत्या.
मच्छिमार सहकारी सोसायट्यांच्या सदस्यांना त्यांच्या नावेकरता लागणाऱ्या डिझेलवरील कराची प्रतिपूर्ती अनुदानस्वरूपात केली जाते. मात्र गेल्या काही काळापासून हे अनुदान थकित असल्याबद्दल काही निवेदने मंत्री महोदयांना प्राप्त झाली होती. त्यावर कारवाई करत श्री. मुनगंटीवार यांनी विभागाला ही अनुदानाची थकबाकी लवकरात लवकर वितरित करावी अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज शासनादेश जारी करण्यात आला असून थकबाकीचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
या अनुदानापोटी 18.37 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर या थकित निधीचे वितरण करण्यात येणार आहे. ऐन दीपावलीच्या दिवसात थकबाकीच्या वितरणाचे आदेश जारी झाल्यामुळे मच्छिमार बांधवांमधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…