The body of a person
मुंबई : मुंबईतील धारावीत राहणाऱ्या 18 वर्षीय अफसाना खान हिचा टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मृत्यू झाला आहे. बाथरुममध्ये टूथपेस्टच्याच बाजूला उंदीर मारण्याची पेस्ट ठेवलेली असल्यामुळे शुक्रवारी सकाळी अफसानाने टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याची पेस्ट ब्रशवर घेतली आणि दात घासले, त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय अफसाना खान सकाळी उठली आणि दात घासायला बाथरुममध्ये गेली. नकळत तिने ब्रशवर उंदीर मारायची पेस्ट लावली आणि ब्रश करू लागली, तिला पेस्टचा वास आणि चव वेगळीच वाटली. त्यानंतर आपण उंदीर मारायची पेस्ट लावल्याचं तिच्या लक्षात आलं, तिने तातडीने तोंड धुऊन काढलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता, अफसानाला चक्कर येऊ लागली आणि तिची तब्येत खालावली. तिने तिच्या कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला. घरच्यांनी तात्काळ अफसानाला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात दोन दिवस अफसानावर उपचार सुरु होते, मात्र रविवारी संध्याकाळी अफसानाचा मृत्यू झाला.
अफसानाच्या कुटुंबात आई, वीस वर्षीय बहीण आणि दोन लहान भाऊ आहेत. आई फळं विकून घर चालवत होती. पोलिसांनी या प्रकरणात एडीआर दाखल करून तिच्या आईचा जबाब नोंदवला. तिच्या आईने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. दरम्यान, याप्रकरणी धारावी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…