Two bodies were found in a canal in Fursungi village
मुंबई : मुंबईतील एका हॉटेलमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवत असताना 61 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध पडली आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मृत व्यक्ती सकाळी १० वाजता उपनगरातील कुर्ला येथील हॉटेलमध्ये ४० वर्षीय महिलेसह आला होता, या व्यक्तीने त्याच्याबरोबर असलेली महिला आपली प्रेयसी असल्याचे सांगितले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, 61 वर्षीय माणूस ४० वर्षीय महिलेसह कुर्ला येथील हॉटेलमध्ये आला होता. त्यांनी एक रुम घेतली होती. हा माणूस वरळी येथील रहिवासी असून एका खासगी कंपनीत काम करत होता. महिलेने हॉटेलच्या रिसेप्शनशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितले की तो माणूस बेशुद्ध पडला होता आणि प्रतिसाद देत नाही. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचार्यांनी ताबडतोब स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली, त्यांनी त्या वृद्ध व्यक्तीला सायन येथील नागरी रुग्णालयात दाखल केले, मात्र, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
कुर्ला पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. महिलेला नंतर कुर्ला पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी करण्यात आली. महिलेने सांगितले की संभोग करताना या व्यक्तीने दारू पिण्याचा प्रयत्न केला, परंतु तो बेशुद्ध पडला. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.
अधिकाऱ्याने सांगितले कि, “आम्ही प्राथमिक माहितीच्या आधारे या प्रकरणात अपघाती मृत्यू अहवाल (ADR) नोंदवला आहे आणि मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी आणि त्याने कोणतीही टॅब्लेट घेतली होती का हे शोधण्यासाठी त्याच्या वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहोत.”
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…