मुंबई

१३ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, ऑनलाइन मोबाइल गेम खेळण्याच्या नादात…

मुंबई : मुंबईतील दादरमधील हिंदमाता परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दादरमध्ये एका १३ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मोबाइल गेम खेळताना टास्क पूर्ण करण्याच्या नादात त्याने हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भोईवाडा पोलीस यासंदर्भात तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय मुलगा सातवी इयत्तेत शिकत होता, परंतु तो सतत ऑनलाइन मोबाइल गेम खेळात असायचा. मुलाचे वडील एका खासगी कंस्ट्रक्शन कंपनीत काम करतात. रविवारी संध्याकाळी ते आपल्या पत्नीसोबत बाहेर गेले होते. यावेळी मुलाने त्यांना फोन केला पण प्रवासात असल्याने ते फोन उचलू शकले नाहीत. त्यांनी काही वेळाने मुलाला फोन केला मात्र मुलाने फोन उचलला नाही. त्यांना चिंता वाटल्यामुळे ते तात्काळ घरी आले. मात्र दरवाजा आतून लावलेला होता. त्यांनी दाराच्या वरच्या बाजूस असलेली काच फोडून दरवाजा उघडला, त्यावेळी त्यांना मुलाचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुलाचा मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला. पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता, त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मुलगा खूपच हुशार होता. त्याला क्रिकेटची आवड होती. मुलाला ऑनलाइन मोबाइल गेम खेळण्याची सवय असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यादृष्टीने तपस सुरु केला आहे. गेम खेळताना काही असं घडलं का, की मुलाने इतके टोकाचे पाऊल उचलले, याचाही तपास केला जात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago