महाराष्ट्र

प्रवीण दरेकरांची ४ तास चौकशी, पोलिसांवर राज्य सरकारचा प्रचंड दबाव, नियमबाह्य प्रश्न विचारले, दरेकरांचा आरोप…

मुंबई : मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची आज मुंबईतील रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. यादरम्यान त्यांना विविध प्रश्न विचारले. चौकशी संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी चौकशीचा तपशील सांगितला तसंच सरकारचा पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा आरोप केला.

चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मी सगळी उत्तरं दिली. पोलिसांनी पाहिजे असलेली सगळी माहिती दिली. पण पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याचं प्रत्येक क्षणी जाणवत होतं. गुन्ह्याशी संबंधित जी जी माहिती विचारली गेली, त्या सर्व प्रश्नांची मी माहिती दिली. काही राज्यस्तरीय फेडरेशनचे प्रश्न विचारले गेले, काही बँकिंगचे प्रश्न विचारले गेले. पण मी मला माहिती असलेली सगळी उत्तरं दिली, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.

अधिकारी प्रश्न विचारत असताना त्यांच्यावर सरकारचा दबाव असल्याचं चौकशी अधिकाऱ्यांच्या प्रश्नांमधून जाणवत होतं. विषय छोटा आहे, परंतु त्याला ताणून मी अधिकाधिक कसा अडकेन, हा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं दिसतंय. अधून मधून अधिकाऱ्यांना कुणाचे तरी फोन येत होते, ते कुणाचे फोन होते, ते मला माहिती नाही. पण मला अडकवण्यासाठी सरकार पोलिसांचा नाहक वापर करतंय. मी पोलिसांना सांगितलं, जेव्हा जेव्हा आपण मला चौकशीला बोलवाल, तेव्हा तेव्हा मी हजर राहिन. राज्याचा विरोधी पक्षनेता असल्याने मला पोलिस प्रोटेक्शन आहे. त्यामुळे घाबरण्याचा प्रश्नच नाही, असंही दरेकर म्हणाले.

काय आहे प्रकरण :
आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी दरेकर यांच्या विरोधात प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे सदस्य होण्यासाठी काही कागदपत्रे बनावट असल्याचा आरोप करत पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. आज चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. ते म्हणणे नोंदवण्यासाठी आज एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात पोहोचले. मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago