Appointment of Bhai Jagtap as Mumbai Congress President
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात आले असून विद्यमान अध्यक्ष भाई जगताप यांना पदावरून दूर करण्यात आलं आहे. जगताप यांच्या जागी पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत एक पत्रक काढून पक्षाचा निर्णय जाहीर केला आहे.
राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर होत असलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. अशातच काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली असून भाई जगताप यांच्या जागी वर्षा गायकवाड यांच्या रुपाने पक्षातील महिला चेहऱ्याला संधी दिली आहे. तसंच गायकवाड यांच्या माध्यमातून शहरातील दलित मतदारांनाही आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…