महाराष्ट्र

सर्व लोकांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावून द्यावेत, आपण हे करू शकता

मुंबई : राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग कमी असलेल्या जिल्ह्यात निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेने देखील पत्रक जाहीर करून मुंबईकरांना काही प्रमाणात सवलत दिली आहे. मात्र, सर्वसामान्यांसाठी लोकल अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत म्हटले कि, “मुख्यमंत्री साहेब सर्व आस्थापना सुरू केल्याबद्दल आपले आभार. मात्र, लोकल बंद आहेत. बसला प्रचंड वेळ लागतो. गर्दीही असते. आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण ‘शिव पंख’ लावून दिलेत तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण होणार नाही. मला खात्री आहे आपण हे करू शकता, आमचा सीएम जगात भारी.”

कोरोना संसर्गाचा दर व ऑक्सिजन बेडची उपलब्धता पाहून निर्बंध शिथील केले जात आहेत. सर्व सरकारी व खासगी कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तरी लोकल बंदी मात्र कायम आहे. किमान लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी विरोधकांची मागणी आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago