Martyr Pradip Mandale's body was cremated
बुलडाणा : जम्मू काश्मिर मधील द्रास भागात लाईन ऑफ मेंटेनन्स करीत असताना हिम वादळामुळे हिमकडा अंगावर कोसळून बुलडाणा जिल्ह्यातील पळसखेडा चक्का येथील जवान प्रदीप साहेबराव मांदळे 15 डिसेंबर रोजी शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव लेह, दिल्ली, मुंबई हवाई मार्गे औरंगाबाद येथे काल 19 डिसेंबर रोजी सायंकाळी आणण्यात आले. औरंगाबाद येथे विमानतळावर लष्कराकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर आज सकाळी औरंगाबाद येथून रस्त्यामार्गे पळसखेड चक्का ता. सिं. राजा येथे त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी लष्कर, पोलीस यांनी बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवान प्रदीप मांडळे यांना मानवंदना दिली. मानवंदनेसाठी 100 आजी – माजी सैनिक उपस्थित होते. काही वेळासाठी पार्थिव शहीद जवान यांच्या घरी अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले. त्यानंतर अंत्ययात्रेला घरापासून सुरूवात करण्यात आली. संपूर्ण गावात रस्त्या–रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या, मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजलीचे बॅनर्स लावण्यात आले. यावेळी संपूर्ण गावात भावनिक वातावरण होते. शहीद जवान प्रदीप मांदळे अमर रहे.. च्या निनादात अंत्ययात्रा गावातून काढण्यात आली. अंत्यसंस्कारावेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भावपूर्ण वातावरणात भारत मातेच्या वीर सुपुत्राला साश्रु नयनांनी शेवटचा निरोप देण्यात आला. प्रदीप मांदळे भारतीय लष्करात 10 महार रेजींमेंटमध्ये कार्यरत होते. त्यांचा जन्म 1 जुलै 1989 रोजी पळसखेड चक्का येथे झाला. औरंगाबाद येथे सैन्यामध्ये शहीद जवान प्रदीप भरती झाले. त्यानंतर 27 ऑक्टोबर 2009 ला महार रेजीमेंट सागर मध्यप्रदेश येथे एका वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून 10 महार रेजीमेंट (सिग्नल प्लाटून) मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. जवळपास महार रेजीमेंट मध्ये त्यांची 10 वर्ष 2 महिने सेवा झाली आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पाच वर्षाचा मुलगा जयदीप व अडीच वर्षाचा मुलगा सार्थक, दोन भाऊ असा परीवार आहे. अत्यंत शोकाकूल वातावरणात शहीद जवान प्रदीप मांदळे यांना त्यांच्या मुलाने मुखाग्नी दिला. यावेळी वातावरण धीरगंभीर झाले होते.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…
मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…
मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…