महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील सर्व महत्वाचे मुद्दे, जाणून घ्या

मुंबई : आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचं ते म्हटले. मी आजपर्यंत जे काही सांगत आलो ते आपण मनापासून अंमलात आणत गेलात, त्यामुळे आपण नियंत्रण मिळवले आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी एक वाजता महाराष्ट्रातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :

  1. राजकीय हल्ले परतवत एक वर्ष यशस्वीपणे पूर्ण केलं. 28 नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारने आपल्या साथीने आणि आशीर्वादाने एक वर्ष पूर्ण केलं. अनेकजण डोळे लावुन बसले होते आता पडेल, मग पडेल. परंतु विकास करत आपण एक वर्ष पूर्ण केलं. ते देखील जागतिक शतकाने येणार्‍या आपत्तीच्या काळात!
  2. समृद्धी मार्गावरचा नागपूर – शिर्डी टप्पा एक महिन्यात पूर्ण होईल. आर्थिक संकटातही विकासकामे सुरु आहेत. आर्थिक चणचण आहे, केंद्राकडून पैसे येणे बाकी आहे. धीम्या गतीने येत आहेत परंतु आपण हताश होऊन बसलो नाही, पुढे जात आहोत.
  3. मला अहंकारी संबोधले जाते, माझ्या महाराष्ट्रासाठी आहे मी अहंकारी! का नसावं? जे जनतेच्या हितासाठी, ते करण्याचा प्रयत्न करत आहे.
  4. नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन कायद्याने लावू शकतो. परंतु धन्यवाद द्यायचे आहेत कारण बहुतांशी लोक सूचनांचे पालन करत आहेत. 70-75 टक्के लोक पालन करत आहेत परंतु उर्वरित लोकांना मी आवाहन करतो की अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आपल्यामुळे हे खबरदारी घेणारे देखील धोक्यात येतात. परदेशातुन येणार्‍या प्रवाशांच्या टेस्ट थांबवा असे लोक म्हणत आहेत, कसं थांबवायचं? आपण धिम्या गतीने पुढे जात आहोत. सावधपणे पावले उचलत आहोत. अनुभवातुन आपल्याला शहाणपण आलेलं आहे.
  5. देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धनजींनी सांगितलं आहे की व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल. त्यामुळे माझ्या मते 6 महिने तरी मास्क लावावा लागेल.
  6. लग्नसराई सुरू झाली की ‘यायच हं!’ असं आमंत्रण द्यायची पद्धत आहे. परंतु हे आमंत्रण आपण कोरोनाला तर देत नाही ना? याची सावधानता बाळगा. आपण बाहेर जात असाल तर मास्क हे सार्वजनिक क्षेत्रात आपले संरक्षण करणारे शस्त्र आहे.
  7. कोरोनाने आता रुप बदलले आहे. आर नॉट असे त्याला टेक्निकल भाषेत संबोधतात. काळासोबत बदला म्हणतात तसं व्हायरसने रुप बदललं आहे. युरोपमध्ये कडक लॉकडाऊन आजपासून का करावा लागला? त्याची कारणे आहेत. सण गेले परंतु आता न्यू ईअर येत आहे.
  8. पावसापूर्वी पेरता पक्षी येतो आणि पेरणीची साद घालतो त्याचप्रमाणे प्रत्येक पावलावर मी तुम्हाला सावध रहा सांगत आलो आहे.
  9. कांजुरची 40 हेक्टर जागा आहे, म्हणजे 25 आणि 40 असा फरक आहे. कांजुरला गवताळ किंबहुना ओसाड जागा आहे. कांजुरला 3 – 4 – 6 या तीन लाईनसाठी आपण कारशेड करू शकतो. केवळ एका लाईनसाठी आरेमध्ये प्रकल्प कशासाठी? आरेमध्ये केल्यास त्याचा वापर केवळ पुढच्या पाच वर्षांसाठी होणार होता. पण जर हे कारशेड कांजूरमध्ये केलं तर त्याचा वापर पुढच्या 40 वर्षांसाठी करता येईल. कांजूरमधून आपल्याला थेट अंबरनाथ, बदलापूरपर्यंत मेट्रो नेता येणार आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “आपल्या विरोधात केंद्र न्यायालयात गेलं. केंद्रानं आणि राज्यानं एकत्रित बसून वाद सोडवणं आवश्यक आहे. विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे.” प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण केला तर आपल्याला खुर्चीत बसण्याचा अधिकार नाही. मी ज्या खुर्चीत बसलोय, त्या खुर्चीच महत्त्व मला माहित आहे. वैयक्तिक आवड-निवड ठेवत नाही, हट्टीपणा नाही, परंतु विकासकामांसाठी पाठपुरावा मी करणारच.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago