महाराष्ट्र

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावाची अनेक कामे प्रलंबित, निवडणुका त्वरीत होण्याची गरज – खासदार सुप्रिया सुळे

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नऱ्हे गावातील पारी टॉवर्स सोसायटीला भेट दिली. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीच्या शेजारी असलेल्या गावांचा मनपात समावेश करण्यात आला. याठिकाणी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, हे प्रश्न सुटायला हवेत. एकूणच या गावातील राहणीमानाचा दर्जा आता उंचवायला हवा, शहरीकरणाचा वेग वाढायला हवा, परंतु अनेक वर्ष होऊनही पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना कोणत्याही सुविधा अजून पुरवल्या गेलेल्या नाहीत. नऱ्हेसह पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट सर्वच गावे मूलभूत प्रश्नसाठी संघर्ष करत आहेत. याठिकाणी नियोजनबध्द विकास होणे शक्य आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी नऱ्हे गावातील पारी टॉवर्स सोसायटीला भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक हे त्यांना भेडसावणारे प्रश्न पारी टॉवर्स मधील सदस्यांनी मांडले. सुप्रिया सुळे यांनी सर्वांना विश्वास दिला कि सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील, तसेच महानगरपालिकेच्या निवडणुका लवकर झाल्यास त्वरित नगरसेवक नेमून कामांना गती देता येईल. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभेचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक अण्णा मोकाशी, भुपेंद्र मोरे, भावना पाटील, स्वाती पोकळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पारी टॉवर्समधील कमिटी सदस्य डॉ. सोमनाथ गिते, निरंजन माळवदकर, शरद शिंदे, प्राजक्ता रणदिवे, रोहन कौसले, गौरीहर अवधूत, दिनेश तांबे, रामचंद्र येलपुरे, अभिषेक कोल्लम, स्वप्नील घन, शुभंकर जोशी, दत्तात्रय पडार, प्रविण कुमकर, अतुल यादव, प्रेम निकुंभ, प्रिती वाळवेकर, प्राजक्ता तट्टू तसेच पारी टॉवर्स सदस्य उपस्थित होते.

पारी टॉवर्स सोसायटीतील सदस्यांनी मांडलेल्या समस्या :

  1. नऱ्हेकडून धायरीला जाणाऱ्या रस्त्यावर खूप अतिक्रमण असल्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण होते, त्यासाठी रस्त्याचे अतिक्रमण हटवून रुंदीकरण करण्याची आवश्यकता आहे.
  2. नऱ्हेकडून धायरी फाट्याकडे, तसेच नवले ब्रिज कडे जाणारा रस्ता खूपच अरुंद असल्यामुळे तिथे देखील रस्ता रुंदीकरणाची आवश्यकता आहे.
  3. पारी चौकात सीएनजी पंप असल्यामुळे तिथे नेहमी वाहनांची रहदारी सुरू राहते, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या उद्भवते, त्यामुळे त्या सीएनजी पंपाचे स्थलांतर होणे आवश्यक आहे.
  4. पारी चौकात डीपी असल्यामुळे तिथे खूपच अरुंद रस्ता आणि गर्दी झालेली आहे, त्यामुळे ती तेथून स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे.
  5. पारी चौकातून धायरीकडे जाताना पुढे कचरा प्रोसेसिंग युनिट आहे, तिथून खूपच जास्त दुर्गंधी येते आणि ते आरोग्यासाठी खूप घातक आहे, असे डॉक्टर बोलत आहेत. सोबत डॉक्टरचे पत्र जोडत आहे. त्याचेही स्थलांतर आवश्यक आहे.
  6. पारी टॉवरच्या आजूबाजूला कंपन्या आहेत, तिथून रात्रंदिवस आवाज येत असतो, त्या आवाजाचा परिसरातील सर्वांनाच खूप त्रास होतो, त्यासाठी देखील आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
  7. ‘पारी’तर्फे पारी टॉवर्सच्या उत्तरेस महानगरपालिकेला जागा देण्यात आली आहे, त्या जागेचा योग्य वापर केला जावा, तिथे वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांसाठी बाग तयार केली किंवा ग्रंथालय उभारण्यात आले तर त्या जागेचा फारच सुयोग्य वापर होईल.
  8. या समस्यांमुळे ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण या समस्या तीव्र होत आहेत, त्यामुळे त्यावर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.
  9. नऱ्हेकडून धायरी फाट्याकडे जाताना वेंकटेश शर्विल सोसायटीसमोर देशी दारूचे दुकान आहे. त्याचा परिसरातील नागरिकांना तसेच महिलांना खूप त्रास होतो, आपणास विनंती आहे की त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा.
  10. नऱ्हेतील संपूर्ण परिसरात पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या आहे, त्यावर ठोस उपाययोजना करावी.
  11. पारी टॉवर्स परिसरात जवळपास कोठेही बस स्टॉप नाही. त्याबाबत काहीतरी उपाययोजना करावी ही विनंती.
  12. पाऊस पडल्यानंतर पारी चौकात खूप जास्त पाणी साठते, त्यासाठी पावसाळ्यापूर्वी काहीतरी उपाययोजना करणे फार आवश्यक आहे.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago