महाराष्ट्र

महाराष्ट्र केसरीला गालबोट; पराभवानंतर पै. शिवराज राक्षेला राग अनावर, पंचांना केली मारहाण

महाराष्ट्र केसरी 2025: राज्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागले आहे. अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेचा अंतिम सामना पै. शिवराज राक्षे आणि पै. पृथ्वीराज मोहोळ यांच्यात पार पडला. यावेळी पृथ्वीराज मोहोळने अवघ्या काही सेकंदात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा पराभव केला. या पराभवाने संतापलेल्या शिवराज राक्षेने थेट पंचाची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ मारली. यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला.

महाराष्ट्र केसरी 2025 ची अंतिम लढत नांदेडच्या शिवराज राक्षे आणि पुणे जिल्ह्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली. पृथ्वीराज मोहोळने काही सेकंदात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला हरवले. पण शिवराजला त्याचा पराभव मान्य झाला नाही. त्याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला. सुरुवातीला त्याचे सहकारी पंचांना बोलायला गेले, त्यावेळी त्यांची पंचांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली.

यानंतर शिवराज तिथे आला, त्यानेही सुरुवातीला पंचांसोबत हुज्जत घातली आणि शेवटी राग अनावर झाल्याने त्याने पंचांची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ मारली. “माझी पाठ टेकली नव्हती,” असे म्हणत शिवराज राक्षेने पराभव अमान्य केला. या गोंधळानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि शिवराजला दूर केले.

या घटनेनंतर शिवराजने व्यासपीठावर खासदार पृथ्वीराज मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलण्याचा प्रयत्न केला. आता या घटनेवर महाराष्ट्र कुस्ती महासंघ काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

22 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago