महाराष्ट्र

‘त्या’ भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

सोलापूर : कर्नाटकमधील भाजपचे नेते जे वक्तव्य करत आहेत ते चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकातील भाजप नेत्यांवर टीका केली आहे. कर्नाटकमधील भाजप नेत्यांचे आम्ही समर्थन करत नाहीत. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यावर होते.

कर्नाटकातील 842 गावांमध्ये असलेले मराठी भाषिक हे आपल्या भूभागासह महाराष्ट्रामध्ये आलेच पाहिजे, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली. ते म्हणाले, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना भेटून आम्ही आमचे म्हणणे मांडणार आहोत.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. मराठा आरक्षणावरुन समाजाची दिशाभूल करण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे. असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर देखील निशाणा साधला.

काय आहे प्रकरण ?

‘सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी कर्नाटकातील मराठी भाषिकांना मुंबई कर्नाटकात सामील करण्याची इच्छा आहे, असं म्हटलं होतं. माझी देखील मागणी आहे की, मुंबई कर्नाटकात सामील करावी. जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत, मी केंद्र सरकारला विनंती करतो की मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावं, असं सावडी म्हणाले होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago