कोल्हापूर

पोलिस हवालदार महिलेने केला सासूला पेटवण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : पोलिस हवालदार असलेल्या महिलेने आपल्या सासूला पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. कसबा बावडा येथे मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घरगुती वादातून घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेत सासू आशालता श्रीपती वराळे जखमी झाल्या आहेत. तर पोलिसांनी हवालदार संगीता राजेंद्र वराळे हिला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगीता वराळे ही महिला कोल्हापूर पोलिस मुख्यालयात नोकरीला आहे. त्या त्यांच्या सासूसोबत बावडा येथील आंबेडकर वसाहत येथे वास्तव्यास होत्या. या दोघींमध्ये कौटुंबिक कारणावरून सतत वाद होत असायचे. सोमवारी मध्यरात्री एक वाजता देखील या दोघींमध्ये वाद सुरु झाला. त्यामुळे संतापलेल्या सूनेने सासूच्या तोंडावर रॉकेल फेकले. त्यानंतर कागद पेटवून सासूच्या दिशेने फेकला. त्यामुळे कपड्याने पेट घेतला. यात आशालता यांचे तोंड व मान भाजल्याने त्या जखमी झाल्या. त्यांच्यावर सध्या एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

रेल्वे स्थानकावर बेशुद्ध पडली महिला, 2 वर्षांच्या चिमुकलीने प्रसंगावधान दाखवत वाचवले आईचे प्राण

शाहूपुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सून वराळे हिला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.

दुःखद : म्युकरमाकोसिसमुळे डोळा गमावलेल्या पोलिसाची आत्महत्या..

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago