महाराष्ट्र

धक्कादायक घटना! ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षावर चाकूहल्ला, राजकीय पूर्ववैमनस्य आणि वैयक्तिक बदनामीच्या रागातून हल्ला

नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्षाने हा हल्ला केल्याचा आरोप माजी नगराध्यक्षाने केला आहे. राजकीय पूर्ववैमनस्य आणि वैयक्तिक बदनामी केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. कुणाल राठोड असं जखमी झालेल्या ठाकरे गटातील नगराध्यक्षाचं नाव आहे.

कुणाल राठोड हे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष आहेत. मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ते आपल्या मित्रासोबत हिमायतनगर शहरातील श्री. परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयाजवळ चर्चा करत बसले होते. काही वेळानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष राम सूर्यवंशी हा तिथे आला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर सूर्यवंशी याने चाकूने कुणाल राठोड याच्या पायावर वार केला. यामध्ये ते जखमी झाले. घटनेनंतर त्यांना उपचारासाठी हिमायतनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होत. मात्र रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

ठाकरे गटाचे माजी नगराधक्ष कुणाल राठोड आणि भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष राम सूर्यवंशी हे जिवलग मित्र होते. काही कारणावरून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. मागील चार ते पाच वर्षांपासून त्यांच्यात राजकीय पूर्ववैमनस्यातून शाब्दिक वाद देखील होत असायचे. त्यातच काही दिवसांपासून कुणाल हा वैयक्तिक बदनामी करायचा असा संशय राम सूर्यवंशीला होता. याच कारणावरून सूर्यवंशी याने कुणालवर चाकूने हल्ला केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं संपूर्ण नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago