महाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा सन्मान पुरस्कार जाहीर, मुंबईत रंगणार दिमाखदार वितरण सोहळा

पुणे, ता. ३ : व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या हजारो बांधवांना व्यसनमुक्त करण्यासाठी राज्यात कार्यरत असणाऱ्या संस्था व कार्यकर्ते यांना त्यांच्या कार्यात बळ, प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा, या उद्देशाने व्यसनमुक्ती परिषद प्रतिवर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा सन्मान पुरस्कार देत असते. दरम्यान, मुंबई येथे मध्यवर्ती कार्यालयात व्यसनमुक्ती परीषदेची राज्य कार्यकारिणीची नुकतीच एक बैठक पार पडली. यात तज्ञ गठित समितीचे डॉ. राजकुमार गवळे यांनी आलेल्या प्रस्तावांची समिती मार्फत छाननी करून अंतिम यादी जाहीर केली आहे. ९ जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत हा वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती राज्याचे कार्याध्यक्ष शिरीष वडजे पाटील व राज्याचे कार्यकारी संचालक सचिन सूर्यवंशी, धनजंय शिंदे यांनी दिली आहे.

व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यकर्त्याचा सन्मान सोहळ्यात नव्या विचारांची देवाणघेवाण व परिषदेच्या आगामी नियोजित, दिल्ली येथील राष्ट्रीय व्यसनमुक्ती प्रशिक्षण व कार्यशाळांचे नियोजनासाठी देखील महत्वपूर्ण बैठक पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर होईल अशीही व्यसनमुक्ती परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. अंजली पाटील व प्रदेश सरचिटणीस प्रा. अजिनाथ शेरकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

समितीच्या वतीने अंतिम निवड करण्यात आलेल्या पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे – कैलास गायकवाड- नांदेड, गजानन रेवनवार- परभणी, दिनकर थोरात- बीड, तत्वशिल कांबळे -बीड, सुर्यभान गभने- गडचिरोली , डॉ. सोमनाथ गिते – पुणे, राजेंद्र माळी -धुळे, निखील ठाकरे -धुळे, रिता कोगंरे -नागपूर , ऊषा घोडेस्वार -भंडारा , दुर्गा शिंदे- उस्मानाबाद, धमलेश सांगोले – भंडारा, अमर भुंगुर्डे -उस्मानाबाद, ऋषिकेश इंगळे – हिंगोली, वर्षा शेरकर -बीड, रामेश्वर परजने – बीड, गोविंद शिंदे -निलंगा, सुनील पवार – मुंबई, दुर्वास खोब्रागडे चंद्रपूर, संदीप करकुटवार – चंद्रपूर , बाबू स्वामी -उस्मानाबाद , संजय कुंबेफळकर – बीड, अशोक राऊत – नाशिक , सुधाकर चारोस्कर – नाशिक , पवार गणपत – नाशिक , गुलाब जाधव – नाशिक , राजाराम जाधव – नाशिक, सुधाकर चारोस्कर -नाशिक , बाळू गांगुरर्डे -नाशिक , चंदन भोरे -नाशिक , सुरेश गायकवाड -नाशिक , प्रमोद सुरवसे -लातूर , अपर्णा खडसे -अकोला, मिलिंद पाटील – ठाणे , डॉ मनीष कंधारे -नांदेड , पियुष ठवरे -भंडारा , रुचिका ठवरे – भंडारा , विशाल सातपुते – सांगली, अरुणा नारनवरे -भंडारा , गोविंद रामटेके -भंडारा , रेखा ठवरे – भंडारा , राहुल वाघमारे – बीड , परमेश्वर सावंत- बीड , गोपाळ पाटील -अमरावती , भाग्यश्री – बोबडे अमरावती, शुभम कळसकर – नांदेड , दिगंबर शिंदे – नांदेड , डॉ विष्णू कांबळे – लातूर , अहिल्या शिंदे -अंबाजोगाई, विठ्ठल आचार्य – लातूर , निलेश कदम -नाशिक , दिशा कालंबे -मुंबई , चारुशीला कांबळे -मुंबई , रवींद्र कांबळे – सांगली , विनोद गवारे – मुंबई , विष्णू रांबडे -मुंबई , मदन शेळके- पुणे, गईदास उगले- परळी , बाबासाहेब घाडगे -परळी , सचिन धुमाळ -परळी, श्याम काटे -परळी, सोपान सूर्यवंशी -परळी , किशोर काटे- परळी , संदिपान काळे- परळी, जयवंत गायके -परळी, सतीश वाघमारे -लातूर , शशिकला नहार -मुंबई , रमेश दिनकर – डोंबिवली, योगिता शर्मा -अहमदनगर, अमर डोरले – बीड, पायल डोळस -वर्धा, स्वाती ञिभुवन-वर्धा, श्रुती ऊईके- वर्धा, राणुबा आधाटे- नाशिक, सुनील बोकेफोड-नांदेड, सुनील पवार -मुंबई सायन, मितेश मोरे – नांदेड, डॉ.प्रियंका वडजे -लातुर, विनोद विठ्ठलराव कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)जळकोट तालूका अध्यक्ष, डॉ विलास भारत राठोड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवा तालुका अध्यक्ष, मुळे हेमंत सर, शिवाजी गवळे मुंबई , देविदास राजाराम शिंदे डोंगरकोनाळी, माधव संग्राम गवळे , ओमकार टाले वांजरवाड, गोपाळ धोंडीबा सोमवंशी, बालिका लक्षीमण मुळे उदगीर , दिपक संभाजी अचमारे, विनायक जनार्दन केंद्रे , दयासागर संभाजी दाडगे, भारत पांडुरंग जाधव , आकबर चंदूसाप सय्यद , माधव मशना कांबळे , रवी मारुती आयनाले, सदानंद संभाजी नामवाड, मारोती गंगाराम कांबळे , भगवान गणेश आवाड , संतोष राजपंखे , तुषार सोनवणे , श्रद्धा मनोज बेले, डॉ प्रियंका भोसले , साक्षी संजय पवार.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago