महाराष्ट्र

लवकरच येतेय करुणा धनंजय मुंडेंची आश्चर्यजनक प्रेमकथा, फेसबूक पोस्टमधून केली घोषणा

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची प्रेमकथा आता पुस्तकाच्या रुपात सगळ्यांसमोर येणार आहे. धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे या लवकरच एक पुस्तक प्रकाशित करणार असून यामध्ये त्या आपली प्रेमकथा सांगणार असल्याची माहिती आहे.

अधिक माहितीनुसार, करुणा मुंडे यांनी फेसबूकवर एक पोस्ट करत याची घोषणा केली आहे. त्यामुळे या पुस्तकातून धनंजय मुंडे यांच्या आयुष्यातल्या आणखी कोणत्या गोष्टी समोर येतात आणि याचा त्यांच्या राजकीय आयुष्यावर काही परिणाम होणार का याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

‘# Karunadhananjaymunde  माझ्या जीवनावर आधारीत सत्य प्रेम जिवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर असुन त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे’ असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी एक फोटोही शेअर केला असून एक आश्चर्यजनक प्रेमकथा असंही त्यावर लिहण्यात आलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यातून ते बाहेर आले, पण आता या प्रेमकथेमुळे धनंजय मुंडे यांच्या वैयक्तिक आयुष्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago