महाराष्ट्र

कारगिल विजय दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते आसामसह अरुणाचल प्रदेशला रुग्णवाहिका भेट

मुंबई : कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी आसाम व अरुणाचल प्रदेश राज्य सैनिक कल्याण मंडळांना प्रत्येकी एक रुग्णवाहिका भेट देण्यात आली. हुतात्मा जवान तसेच माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या अथर्व फाउंडेशनच्या वतीने दोन्ही राज्यांना रुग्णवाहिका भेट देण्यात आली.

देशाचे वीर जवान प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करीत असतात. अश्यावेळी हौतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांच्या तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी काम करणे नागरिकांचे कर्तव्य असते असे सांगून राज्यपालांनी अथर्व फाऊंडेशनचे अभिनंदन केले. अथर्व फाऊंडेशन ही संस्था देशाच्या कानाकोपऱ्यातील हुतात्मा जवानांच्या मुला – मुलींच्या शिक्षणासाठी करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे उद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.

कार्यक्रमाला अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष, आमदार सुनील राणे, निमंत्रक कर्नल (नि.) सुधीर राजे, कर्नल एस. चॅटर्जी, डॉ. बालाजी शिंदे व आसाम रायफलचे अधिकारी व जवान उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago