जळगाव

भीषण अपघात! दुचाकी घसरल्याने रस्त्यावर पडलेल्या मुलाला ट्रकने चिरडले

जळगाव : ट्रकने दुचाकीवर मागे बसलेल्या शाळकरी मुलाला चिरडल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. जळगावकडून मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. सुजय गणेश सोनवणे (वय १३) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

मोहाडी येथील सुजय गणेश सोनवणे हा सेंट टेरेसा शाळेत इयत्ता ४ च्या वर्गात शिकत होता. बुधवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. राजू गवळी यांच्याबरोबर दुचाकीने सुजय शाळेतून घरी येत होता. मोहाडी रस्त्यावर रस्त्यालगत पडलेल्या खडीवर दुचाकी घसरली. त्यामुळे, दुचाकीवर मागे बसलेला सुजय हा रस्त्यावर पडला. याचदरम्यान समोरून येणार्‍या ट्रकने सुजयला चिरडले व त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून घटनास्थळावरून पलायन केले.

दरम्यान, सुजयचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आक्रोश करत आहेत. स्थानिक नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दुचाकी व ट्रक ताब्यात घेतली. या अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हा परिषद सदस्य तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा मुलगा प्रतापराव पाटील यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

19 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago