महाराष्ट्र

जळगावात भीषण अपघात : लक्झरी बस थेट पुलावरून नदीत कोसळली – तिघांचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी

जळगाव : इंदूरहून भुसावळकडे जाणारी खासगी लक्झरी बस रविवारी पहाटे भीषण अपघाताला सामोरी गेली. आमोदा गावाजवळ मोरनदीवरील पुलावरून बस अनियंत्रित होऊन थेट नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून तब्बल २५ प्रवासी जखमी झाले आहेत.

ही घटना पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. एमपी-०९-९००९ क्रमांकाची बस पुलावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बसने पुलावरील बॅरिकेट्स तोडले आणि थेट कोरड्या नदीपात्रात पडली. पुलावरून कोसळल्यानंतर बस उलटली आणि अनेक प्रवासी त्याखाली अडकले.

अपघाताची माहिती मिळताच गावकरी आणि पोलिसांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

नदीत पाणी नसल्याने मोठा अनर्थ टळला

सुदैवाने या काळात नदीला पाणी नव्हते. अन्यथा मृतांचा आकडा अधिक वाढला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातात जखमी प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी व पोलिसांनी मोठे प्रयत्न केले.

महिनाभरात २६ अपघातांचा शोकांतिका

फैजपूर–आमोदा रस्त्यावर अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असून, एका महिन्यात या मार्गावर तब्बल २६ अपघात झाले आहेत. रस्त्याची अवस्था निकृष्ट असल्याने वाहन चालवताना नियंत्रण राखणे अवघड जाते, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे. “ब्रेक दाबल्यावरही गाडी घसरत जाते,” अशी तक्रार चालकांनी केली. परिणामी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

अपघाताची नोंद फैजपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago