क्राईम

कोंढवा प्रकरणात धक्कादायक वळण: बलात्काराचा आरोप फसवा? दोघे मित्रच निघाले! फोटोही ॲपमधून एडिट

पुणे : कोंढव्यातील एका उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या संगणक अभियंता तरुणीने दाखल केलेल्या बलात्काराच्या तक्रारीत पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करताना, काही गोष्टी खोट्या असल्याचे स्पष्ट झाले असून, तक्रारीमागील हेतू काय, हे जाणून घेण्यासाठी स्वतंत्र चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि तरुणी गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांचे परिचित नव्हे, तर नियमित संवाद साधणारे मित्र होते. ते एकमेकांना वारंवार भेटायचे आणि फोनवर बोलायचे. या प्रकरणी तरुणीनेच आरोपीला फोन करून घरी बोलावल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सच्या आधारे हे निष्कर्ष काढले आहेत.

तरुणीने तक्रारीत केलेले आरोप – आरोपी कुरिअर बॉय असल्याचे सांगून घरात घुसला, तोंडावर स्प्रे फवारला आणि जबरदस्ती केली – हे तपासात टिकलेले नाहीत. कुठलाही स्प्रे वापरण्यात आला नसल्याचेही तपासात सिद्ध झाले. तसेच, ‘मी परत येईन’ असा मजकूर असलेला फोटोही तरुणाने पाठवला नसून, तो तरुणीनेच ॲपमधून संपादित केला असल्याचे सायबर तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी यासंदर्भात सुमारे ५०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. शुक्रवारी (४ जुलै) तरुण एका लग्नसमारंभात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीसाठी कोंढवा पोलिस ठाण्यात आणून, त्याची व तरुणीची समोरासमोर विचारपूस करण्यात आली. त्यानंतर दोघांच्या पालकांना याबाबत माहिती देण्यात आली.

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे – तक्रार दाखल झाल्यानंतर समाजात वेगळीच चर्चा सुरू झाली आणि आरोपीच्या कुटुंबावर मानसिक ताण निर्माण झाला. त्यामुळेच पोलिस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या प्रकरणात तक्रार का दाखल करण्यात आली? काही आर्थिक किंवा इतर कारणांनी तक्रार झाली का? या बाबतही पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी पवार यांनी सांगितले की, “तरुणीने काही गोष्टी चुकीच्या सांगितल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, तिने जबरदस्तीचा आरोप कायम ठेवला आहे. प्रकरणातील गुंतागुंत पाहता आरोपीला अटक न करता नोटीस देण्यात आली असून, तपास सुरूच राहील.”

प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

7 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago