महाराष्ट्र

सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या करार पद्धतीने नेमणुका, मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या ‘या’ सूचना

मुंबई : लम्पी चर्मरोग नियंत्रण व क्षेत्रीय भेटीसाठी जिल्हाधिकारी स्तरावरून वाहने उपलब्ध करून द्यावीत. तसेच 30 सप्टेंबर 2022 पर्यंत जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी कंत्राटी मनुष्यबळ आणि खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा उपलब्ध करण्याबाबतच्या सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.

लम्पी चर्मरोग नियंत्रण आणि लसीकरणासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत फिरत्या पशुचिकित्सालय पथकांवर 65 सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या करार पद्धतीने नेमणुकांचे आदेश पशुसंवर्धन आयुक्त यांच्या स्तरावरून निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

लम्पी चर्मरोग नियंत्रण आणि लसीकरणाबाबत राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह उपस्थित होते. यावेळी मुख्य सचिव श्रीवास्तव यांनी लम्पी रोग नियंत्रणात आणण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर पशुसंवर्धन विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी पशुपालकांना लम्पी आजाराविषयी पूर्ण सहकार्य करावे. तातडीने उपचारासाठी उपलब्ध व्हावे. लसमात्रा मोठ्या प्रमाणात पुरविण्यात आल्या आहे. लसीकरण जलद गतीने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago