महाराष्ट्र

‘वन स्टॉप सेंटर’ योजनेच्या अंमलबजावणीची माहिती घ्यावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई : देशातील अन्य राज्यात ‘वन स्टॉप सेंटर’ या योजनेच्या केलेल्या अंमलबजावणीची माहिती घ्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालयातील दालनात राज्यातील वन स्टॉप सेंटर स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री कु.तटकरे बोलत होत्या.

यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, स्वयंप्रेरणा ग्रामीण महिला संघटनेचे अध्यक्ष ॲड. शाहू काटकर (कोल्हापूर), सामाजिक आर्थिक स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी, सानेगुरूजी फाऊंडेशन फॉर एज्युकेशन कल्चर ॲण्ड रुरल डेव्हलपमेंट रिसर्चचे अध्यक्ष नरेंद्र बाळू पाटील (जळगाव), सुरभी स्वयंसेवी संस्थेच्या (अलिबाग) अध्यक्ष सुप्रिया जेधे उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, राज्यात ‘वन स्टॉप सेंटर’ चालविण्याबाबत केंद्र शासनाचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे अन्य राज्यात कशा प्रकारे अंमलबजावणी केली जाते याची माहिती घेऊन सादर करावी, या विषयावर विभागाने प्रस्ताव तयार केल्यानंतर त्यावर कार्यवाही करण्यात येईल. सामाजिक संस्थामार्फत ‘वन स्टॉप सेंटर’ सुरू होते. त्यांना मानधन अदा करण्याबाबतचाही निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago