महाराष्ट्र

‘मिशन महाग्राम’साठी आयडीबीआय बँकेकडून ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनला ११ कोटी ६२ लाखांचा निधी

मुंबई : ‘मिशन महाग्राम’ अंतर्गत ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन व आयडीबीआय बँक यांच्या दरम्यान आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार तसेच धनादेशाचे हस्तांतरण करण्यात आले.

या ‘मिशन महाग्राम’ मध्ये आयडीबीआय बँकेच्या सहकार्याने राज्यातील १०४ गावांमध्ये पुढील ३ वर्षात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी बँक ११ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी दिला आहे. तसेच विविध रोजगार निर्मिती व गावाच्या सर्वांगीण विकास कार्यात अग्रणी भागीदार म्हणून सहकार्य करणार आहे. यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला, तसेच बँकेकडून ११ कोटी ६२ लाख रुपयांचा धनादेश ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच मंत्रिमंडळातील सदस्य यांच्यासह ‘मित्रा’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, तसेच आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश शर्मा, व्यवस्थापकीय संचालक श्रीमती बलजिंदरकौर मंडल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी सन २०२२ ते २०२५ दरम्यान ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान- २ हे ‘मिशन महाग्राम’ म्हणून राबविण्यात येणार आहे. याबाबीचा अर्थसंकल्पातच समावेश करण्यात आला आहे.

आयडीबीआय व ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन तर्फे राज्यातील ५ जिल्ह्यांमधील ८ तालुक्यांतील १०४ गावामंध्ये कृषी व कृषी संलग्न क्षेत्र, ग्रामीण गृह निर्माण क्षेत्र, ग्रामीण आरोग्य क्षेत्र, पाणी पुरवठा व स्वच्छता व जलसंधारण क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, उपजीविका क्षेत्र आणि विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर व कन्नड तालुके, जळगाव मधील जामनेर, पुणे जिल्ह्यातील बारामती व दौंड, सोलापूर मधील अक्कलकोट व पंढरपूर, आणि नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यांचा समावेश आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago