महाराष्ट्र

नव्या पिढीचे शिल्पकार! डॉ. सोमनाथ गिते यांच्या व्यसनमुक्तीच्या कार्याचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’कडून गौरव

पुणे : आजकाल तरुणाई व्यसनाच्या विळख्यात अडकताना दिसत आहे. हा विळखा तरुणाईसोबतच देशाचे भवितव्य देखील जखडून ठेवत आहे. आज आपला देश अनेक गोष्टींमध्ये जगापुढे एक आदर्श ठेवत असताना देशाची भावी पिढी सक्षम असणे आणि तिच्यात नीतिमूल्ये रुजवणे ही अतिशय महत्वपूर्ण जबाबदारी आहे. व्यसनमुक्तीसाठी काम करणारे कार्यकर्ते ही जबाबदारी पेलण्यासाठी सरसावले असून यादृष्टीने भरीव काम करत आहेत. त्याअर्थाने एकप्रकारे हे सर्वजण नव्या पिढीचे शिल्पकार आहेत, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

याच विषयावर अनेक वर्षांपासून काम करणारे कार्यकर्ते डॉ. सोमनाथ गिते यांच्या कार्याचा गौरव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थांनी केला आहे. INDIA’S WORLD RECORDS मध्ये अगोदरच त्यांच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे.

समुपदेशन, वर्तमानपत्रं, मासिक, सोशल माध्यमांतून जनजागृती करत समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे काम डॉ. सोमनाथ गिते यांनी केले आहे. या कार्याचा गौरव म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले असून यापूर्वी त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाची आणि या क्षेत्रातील त्यांनी केलेल्या अभ्यासाची दखल घेत विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंटकडून डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. तसेच, व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार २०२२, राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२२, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२२ असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, डॉ. मुक्ता पुणतांबेकर, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, स्व. मुक्ता टिळक, आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेवक युवराज बेलदरे यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago