Status of sport to Dahihandi, Chief Minister Eknath Shinde announced in the Assembly
मुंबई : दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग स्पर्धेत मानवी मनोरे रचताना होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
मंत्री बनसोडे म्हणाले की, दहिहंडी उत्सव, प्रो. गोविंदा लीगमधील सहभागी गोविंदांना मानवी मनोरे रचताना अपघात, दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यातूनच काही गोविंदांना अपघात होऊन, गोविंदांचा मृत्यू घडून येण्याची किंवा त्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता निर्माण होते.
यासाठी शासन निर्णय १८ ऑगस्ट, २०२३ नुसार विमा संरक्षण उपलब्ध करून दिलेल्या ५०,००० गोविदांव्यतिरिक्त अतिरिक्त आणखी २५,००० गोविंदांना विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्याकरीता ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीला प्रति गोविंदा ७५ रुपये विमा हप्ता याप्रमाणे एकूण रु.१८ लाख ७५ हजार इतका निधी अदा करण्यासाठी दहीहंडी समन्वय समिती या संस्थेस वितरित करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे सांगितले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…