महाराष्ट्र

जितेंद्र आव्हाड यांनी केला मोठा खुलासा, आमदारांना ‘ती’ घरे मोफत देण्यात येणार नसून…

मुंबई : राज्यातील आमदारांसाठी मुंबईत ३०० घरे बांधण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आल्यानंतर कालपासून सरकारवर जोरदार टीका होत आहे. त्यातच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आमदारांना ही घरे मोफत दिली जाणार नसून त्यांच्याकडून पैसे घेण्यात येणार आहेत, असा खुलासा त्यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत सांगितले की आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होत आहे. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत तसंच बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च ७० लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे.

सरकारच्या निर्णयावर राज्यभरात प्रतिक्रया
आमदारांना घरे देण्याच्या निर्णयावर सोशल मीडियात सर्वसामान्य नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत असताना लोकप्रतिनिधींनीही या निर्णयावर भाष्य केलं. दरम्यान, सत्ताधारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आपण या निर्णयाबाबत असहमत असल्याचं सांगितलं होतं.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago