rain in maharashtra for next three days
पुणे : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचं आगमन झालं आहे. अरबी समुद्रात आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर पुण्यात आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे.
राज्यात आजपासून पुढील चार दिवस मान्सून सक्रिय होत असून, राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, मुंबई, पालघरसह इतर 13 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर 28 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याने मान्सूनचे वारे प्रचंड वेगाने वाहत असून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
चार दिवस पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागाने पुणे घाटमाथ्याला 24 ते 27 ऑगस्ट हे चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शनिवार ते सोमवार पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट तर मंगळवारी यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, सतर्क रहावं, आवश्क असल्यास घराबाहेर पडावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे, त्याचबरोबर घराबाहेर जाताना छत्री, रेनकोट घेऊनच बाहेर जावे. झाडाखाली थांबू नये, असा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…