राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई टोपे यांचं दुख:द निधन झालं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 74 वर्षाच्या होत्या.
महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात सापडलेला असताना दुसरीकडे आई आजारी होती पण राजेश टोपे कोरोनाविरूद्धच्या लढाईत मागे हटले नाहीत किंवा आपल्या कौटुंबिक दु:खाची त्यांनी चिंता केली नाही. मात्र आईच्या जाण्यानंतर त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. आपल्या आईबरोबरचा अखेरचा संवाद राजेश टोपेंनी ट्विट करून सांगितला आहे.
राजेश टोपे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, “ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. ४ वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती.दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आशीर्वाद दिले. तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील”
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…